व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला म्हसवड, )___: माण-खटाव विधानसभा क्षेत्रात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाची प्रचंड लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना स्थानिक जनतेकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी नवा आशावाद पसरला आहे. यानिमित्ताने, प्रभाकर घार्गे यांच्या समर्थनार्थ सुरू झालेल्या मतदार संवाद यात्रेत प्रभाकर देशमुख यांनी दिलासा दिला की, “पवार साहेबांनी आपल्यासाठी जो उमेदवार दिला आहे, त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार आहोत.”
प्रचारात विशेष करून वाचनालयाच्या प्रश्नाला उजाळा देण्यात आला आहे. “सध्याच्या आमदारांनी वाचनालयाचे काम थांबवले आहे; परंतु आमचे सरकार येताच हे काम प्राधान्याने पूर्ण करून गावात वाचन संस्कृतीसाठी सुविधा निर्माण केली जाईल,” असे प्रतिपादन करण्यात आले. याशिवाय, दलित वस्त्यांमधील मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी पुढे नेण्याचा व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला .
प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारीसाठी, स्थानिक नेते, कार्यकर्ते व नागरिक एकत्र येत असून एकोप्याने कार्यरत आहेत. “कोणाच्याही मनात शंका न ठेवता सर्वांनी हातात हात घालून जोमाने कामाला लागावे,” असे आवाहन करण्यात आले आहे. यासह, “प्रभाकर घार्गे यांना आमदारपदी न भूतो न भविष्यति अशा बहुमताने निवडून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” अशी एकजूट कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे.
तुतारीचे नारे देत माण-खटावमध्ये जनतेत नवचैतन्य निर्माण होत असून, पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवारास पाठिंबा मिळवून देण्यासाठी प्रत्येक जण जोमाने कार्यरत आहे. सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा पाहता, आगामी निवडणुकीत प्रभाकर घार्गे यांचे यश निश्चित मानले जात आहे. यावेळी प्रभाकर घाडगे साहेब प्रभाकर देशमुख साहेब माजी कोकण आयुक्त, अनिल भाऊ देसाई,जय राजमाने,पृथ्वीराज राजेमाने, परेश भाई होरा, किशोर सोनवणे, सचिन लोखंडे, भीमराव लोखंडे, कांतीलाल लोखंडे,विलास रुपनवर, चंद्रकांत केवटे, विकी लोखंडे, विशाल लोखंडे, राजेश लोखंडे, संभाजी लोखंडे,विकास लोखंडे,राजेश लोखंडे, किरण लोखंडे,सनि लोखंडे, किरण देवकुळे, विशाल लोखंडे,हिम्मत लोखंडे, अरुण देवकुळे, शिवम माने,अक्षय अवघडे, आषीश लोखंडे,गणेश कांबळे, योगेश लोखंडे,आदर्श लोखंडे,सचिन लोखंडे,विकास लोखंडे,संजय लोखंडे,अनिल लोखंडे, गुरुदास लोखंडे,यश लोखंडे, मंगेश लोखंडे,मुकुंद तोरणे,बबलू लोखंडे, किरण लोखंडे,अक्षय लोखंडे,तुषार लोखंडे मल्हार नगर येथील सर्व बंधू आणि बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.