दहिवडी पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम ; येळेवाडी आश्रमशाळेत रक्षाबंधन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले-
ये बंधन तो प्यार का बंधन है… या गाण्याची प्रचिती श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा येळेवाडी येथील चिमुकल्यांना आली. दहिवडी पोलीस स्टेशनच्यावतीने येळेवाडी आश्रम शाळेत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी दहिवडी उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे,दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे, शाळेचे संचालक शिवाजी महानवर,मुख्याध्यापिका सुरेखा महानवर ,वैभव महानवर यांच्यासह निर्भया पथकाचे तानाजी चंदनशिवे आणि सहकारी व शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बालचमू उपस्थित होते.
         दहिवडी उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते स्वतःला राखी बांधत स्वहस्ते चिमुकल्यांनाही राखी बांधली. लहानग्यांना त्यांनी मायेने पेढा भरवत त्यांचा दिवस गोड केला. त्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस ,दाखवलेला स्नेह यांमुळे उपस्थित सर्वांचीच मने त्यांनी जिंकली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शाळेसाठी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कोणतीही मदत लागेल ती देऊ. ज्या ज्या वेळी गरज पडेल त्या त्या वेळी शाळेला मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आमच्या माध्यमातून आम्ही या चिमुकल्यांचा आनंद वाढवू शकलो.या गोष्टीचा आनंद आहे,असेही त्यांनी सांगितले.
     सपोनि. सोनवणे म्हणाले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून हा सण अशाप्रकारे साजरा करायला मिळत असल्याने हा विलक्षण अनुभव आहे. या माध्यमातून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करता आला,याचे समाधान वाटते. लहानग्यांना आश्रमशाळेत घरापासून दूर ठेवले जाते, त्यामुळे त्यांना असे सण साजरे करता येत नाहीत,त्यामुळे त्यांना आनंद देता आला ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!