गुरूंच्या बद्दल असणारी आदरयुक्त भावना व्यक्त करत अनोखा स्नेह मेळावा संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे: प्रतिनिधी
गोंदवले खुर्द
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत गोपाळ कृष्ण विद्यालयाच्या 1986/87 बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पाद्य पूजन करून आपल्या गुरूंच्या बद्दल असणारी आदरयुक्त भावना व्यक्त करत अनोखा स्नेह मेळावा गोंदवले खुर्द येतील वाडा हॉटेलमध्ये साजरा केला
सध्याच्या जमान्यात फ्लॅट संस्कृती मुळे आपल्या शेजारी काय सुरू आहे हे समजत देखील नाही मोबाईल आणि इंटरनेट ने त्यात भर घातली असून पुर्वी सारखी कोणी ख्याली खुशाली विचारताना दिसत नाही मात्र गोंदवले खुर्द येथील 1986/87 साली रयत शिक्षण संस्थेच्या गोपाळ कृष्ण विद्यालयात शिकणाऱ्या त्या वेळच्या विद्यार्थ्यानी शाळा सोडून 36 वर्ष पूर्ण झाली होती यातील काही मित्र मैत्रिणी प्रत्यक्षात किंवा मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात होते मात्र बाकीचे मित्र काय करतात त्याच बरोबर त्यावेळी त्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक सध्या काय करतात हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा एकत्र येण्याचा मानस व्यक्त करत सर्व शिक्षकांशी संपर्क साधता त्यांना या हा स्नेह मेळाव्याची रूपरेषा सांगत हा कार्यक्रम आयोजित केला.
सर्व प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण करून झाली त्या नंतर सर्व शिक्षकांना एक रांगेत बसवून त्यांचे पाद्य पूजन करून त्यांना फुले वाहण्यात आली व सर्व मुलांनी नतमस्तक होऊन शिक्षकांचे दर्शन घेतले व सगळ्यांना सन्मानित करण्यात आले .विजय कदम यांची कन्या यावेळी मयुरी कदम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून नगर पालिका मुख्याधिकारी पद मिळवल्याने तिचा सत्कार करण्यात आला
यावेळी हणमंत इंगवले, पुकळे सर, भोसले सर,माजी शिक्षणाधिकारी व्ही आर सरगर,वाय बी यादव सर,दोलताडे सर,तोडकर सर, गौतम सावंत, उपसरपंच अमोल पोळ जेष्ठ नागरिक पांडुरंग फाळके,उत्तमराव फाळके यांच्या सह सन्मानिय नागरिक उपस्थित होते
या बरोबरच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले
प्रस्तावित दिपक पोळ विजय ढालपे सूत्रसंचालन प्रताप अडसर आभार राजेंद्र फाळके यांनी मानले.