चोरी झालेले ७ लाख २०,हजार रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल हस्तगत करून मुळ तक्रारदारांना परत दहिवडी पोलीसंची उत्कृष्ठ कामगिरी.*

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी
     दहिवडी पोलीस ठाणेहद्दीतून नागरिकांचे गहाळ / चोरी झालेले ७ लाख २०,हजार रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल हस्तगत करून मुळ तक्रारदारांना परतकरण्यात आले. स.पो.नी.मा.श्री.अक्षय सोनवणे यांनी सिंघामगिरी केली सिध्द.
        दहिवडी – मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वडुज श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.अक्षय सोनवणे यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी दहिवडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अमंलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना दिलेल्या होत्या.                     त्याअनुशंगाने पथकातील पोलीस स्टाफने  सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरविलेले मोबाईलबाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण७,२०,०००/- रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

         आज रोजी मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वडुज श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे हस्ते मुळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहिम मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वडुज श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबवण्यात येणार असल्याचे दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे यांनी सांगितले आहे.

    सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कॅम्प वडुज श्रीमती अश्विनी शेंडगे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे, पो. हवा. बापु खांडेकर, पो.ना. नितीन धुमाळ, पो.कॉ. निलेश कुदळे, पो.कॉ. असिफ नदाफ, पो.कॉ. महेंद्र खाडे. सायबर पोलीस ठाणेचे पो. कॉ. महेश पवार, यांनी केलेली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!