पशुधनावर तरसाचा हल्ला…एका पशुधनाचा मृत्यू तर एक गंभीर जख्मी..

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

म्हसवड प्रतिनिधी –

    म्हसवड येथील गुरवकी शिवारातील धनाजी गुरव यांच्या गोठ्यातील पशुधनांवर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजनेंच्या सुमारास तरसाने हल्ला केल्याने यात म्हशीच्या रेडीचा मृत्यू व रेडा गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे

        याबाबतची शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी माणनदीच्या दक्षिणेला गुरवकी शिवार आहे तेथे धनाजी प्रभाकर गुरव यांचे शेती आहे. या शेतालगतच जनावरांचा गोठा आहे त्याठिकाणी मोठी जनावरे बाहेर शेतात चरण्यासाठी बांधून व लहान रेडी व रेडा यांना गोठ्यात बांधून काढलेले दूध घरी ठेवण्यासाठी धनाजी गुरव घरी आले होते.ते घरुन दहा वाजनेच्या आसपास शेतात गेले. त्यानंतर ते गोठ्यात जेवनाचा डबा ठेवण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आले कि गोठ्यातील दोन्ही लहान जनावरे जखमी अवस्थेत निपचित पडलेली होती. त्यानंतर त्यांनी लगेच म्हसवड येथील जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टरांना फोन लावला त्यानंतर तातडीने डॉक्टरांनी येऊन जख्मी रेड्यावर उपचार सुरू केले परंतु तत्पूर्वी रेडकाचा मृत्यू झाला होता या घटनेत मृत्यू झालेल्या रेडकाचे अंदाजे वय २ महिने पंचनामा केला आहे तरी शेतकरी धनाजी प्रभाकर गुरव यांच्या पशुधनाचे झालेले नुकसानीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळावी अशी मागणी होत आहे.

चौकट – गुरवकी शिवारात तरसाची दहशत…
या परिसरात रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तरस अचानक समोर येत असल्याने येथील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे त्यात आजची पशुधनावर हल्ल्याची घटना यामुळे तर आणखी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी अजून एखादी घटनेची वाट न पाहता या परिसरातील तरसांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकर्यातून होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *