जबरी चोरीची थरारक घटना – तिन अनोळखी इसमांकडून महिलेला मारहाणीची धमकी देत 2 लाख 14 हजाराचे दागिने लंपास

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:-(प्रतिनिधी )

म्हसवड ता. माण हद्दीतील शेनवडी फाटा परिसरात दिनांक 4 जून रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास एका महिलेला मारण्याची धमकी देत तिघा अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सौ. सावित्री श्रीपती गलंडे (वय 45, व्यवसाय व्यापारी, रा. वाक्षेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. दिघंची) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्या शेनवडी मार्गे म्हसवडकडे येत असताना शेनवडी फाटा येथे तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनासमोर मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबवले. त्यापैकी दोन इसम त्यांच्या जवळ आले आणि “तुमच्याकडे असलेले सोने आम्हाला द्या, अन्यथा तुम्हाला ठार मारू” अशी धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र, बोरमाळ, लक्ष्मीहार, चैनीतील माळ, आणि मिनी गंठण असे एकूण 2लाख 14 हजार रुपये किंमतीचे दागिने हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 175/2025 अन्वये BNS 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली आर. के. फडतरे करत आहेत.

पोलिसांकडून तीन अनोळखी, अंदाजे 20 ते 30 वयोगटातील आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!