समृद्ध देशासाठी बलवान युवा पिढी काळाची गरज. …..मोहन जोशी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
भारत देश सर्वांगीण दृष्ट्या समृद्ध बनविण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या बलवान युवा पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व सोलापूर जिल्हा काँग्रेसचेअध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर,संस्था उपाध्यक्ष अँङ. इंद्रजीत बाबर,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब इनामदार,विकास गोजारी, रोहन सुरवसे पाटील,अनिल लोखंडे, दाऊद मुल्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहन जोशी म्हणाले आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून पुढे वाटचाल करीत आहोत.देशाचे स्वातंत्र्य खूप कष्टातून त्यागातून मिळविले, त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांनी प्रचंड संघर्ष केला. अनेकजण शहीद झाले. हजारोच्या बलिदान व त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. सर्वगुणसंपन्न युवा पिढी ही देशाची खरी संपत्ती आहे. देश आपल्यासाठी काय करतोय त्यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय याची आठवण ठेवा.आई वडील व गुरुजनाचा आदर ठेवा.शिकून खूप खूप मोठे व्हा.तुम्ही बलवान झाला तर देश बलवान होण्यास वेळ लागणार नसल्याचे स्पष्ट मत जोशी यांनी व्यक्त केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना खूप मोठी संधी बाबर दाम्पत्यानी उपलब्ध करून दिलेले आहे ही बाब माणवासिया साठी अभिमानाची असल्याचे जोशी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची सर्वांगीण प्रगती आम्हा सर्वांच्या साठी प्रेरणादायी आहे.बौद्धिक प्रगती बरोबरच क्रीडा क्षेत्रात या संस्थेचे नाव झालेले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावी बारावीचे दर्जेदार निकाल,नीट परीक्षेतील भरघोस यश हाच या संस्थेचा उज्वल दाखला असल्याचे मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताविक संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी केले.सूत्रसंचालन प्राचार्य राहुल फुटाणे यांनी केले .यावेळी संकुलातील शिक्षक, विद्यार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.