म्हसवड बस स्थानक परिसरातील पथदिवे सुरू करण्यासाठी काँग्रेसचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड बस स्थानक नजीकच्या सातारा पंढरपूर राज्य महामार्गावरील गेले अनेक वर्ष बंद असणारे विद्युत पथदिवे सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे
नुकतीच केली आहे.
मूलभूत सुविधा व सुरक्षा लक्षात घेता विद्युत पथदिवे तातडीने सुरू करण्याची लेखी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी,ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब आटपाडकर,प्रदेश युवक काँग्रेसचे चिटणीस निलेश काटे,
सातारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सावंत,माण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज पोळ तसेच प्रकाश कुलकर्णी यांनी म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे केली आहे.
म्हसवड बस स्थानका नजीक सातारा पंढरपूर राज्य महामार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी विद्युत पथदिवे बसवलेले आहेत.मात्र सदर यंत्रणा बसवल्यानंतरअल्प कालावधीतच त्यातील बरेचसे पथदिवे बंद पडलेले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत या यंत्रणेत किरकोळ दुरुस्तीचे काम केले.मात्र त्यात फारशी सुधारणा झालेली नाही. सदर ठिकाणचे पथदिवे कोणी सुरू करायचे,यावरून म्हसवड नगरपालिका व रस्ते विकास महामंडळ कार्यालय पुणे यांच्यात विसंवाद दिसून येत होता.
सदर पथदिवे सुरू होणे कामी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने प्रा. विश्वंभर बाबर यांनी रस्ते विकास महामंडळ पुणे अधीक्षक अभियंता अश्विनी घोडके यांच्याकडे वरचेवर पाठपुरावा केलेला होता . स्थानिक रहिवासी सुविधा व वाहतूक सुरक्षा लक्षात घेता सदर काम होणे साठी काँग्रेस पदाधिकाऱ्यानी म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांची भेट घेऊन सदर काम मार्गी लावण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ?. याबाबत विचारणा केली. दरम्यान मुख्याधिकारी,व काँग्रेस पदाधिकारी यांनी पुणे कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता सदर काम तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही अधीक्षक अभियंता अश्विनी घोडके यांनी दिली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!