म्हसवडजवळ भरधाव ट्रकची भीषण धडक; १९ वर्षीय ओंकारचा मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण)

“घराचा लाडका पुतण्या… नुकताच जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केलेला मुलगा… आणि एका क्षणात सर्व काही संपले!” सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) सायंकाळी नायरा पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने लोणार खडकी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सायंकाळी साधारण ४.४५ च्या सुमारास ओंकार रमेश खांडेकर (वय १९) हा आपल्या मोटारसायकलवर (क्र. MH-12-RB-1939) पेट्रोल भरून बाहेर पडत होता. इतक्यात पंढरपूरकडून येणारा मालट्रक (क्र. MH-18-BZ-1325) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत चालक विजय शाहु माने (रा. गोंदवले बु.) याने जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, ओंकारला जागीच प्राण गमवावे लागले.

या घटनेची फिर्याद ओंकारचा काका विजय सोमा खांडेकर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.

गावातील सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, “अजून तरुण वय, आणि असे अचानक जाणे… नियती किती निर्दयी असते!” अशा भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!