भरधाव वेगातील वेरणा गाडीची शिक्षकांच्या दुचाकीला धडक; शिक्षक गंभीर जखमी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

मोगराळे (प्रतिनिधी) –

माण तालुक्यातील किरकसाल शाळेत कार्यरत असलेले शिक्षक मोहन भगवान परहार हे निवडणूक प्रशिक्षणासाठी दहीवडीला जात असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. मंगळवारी सकाळी गोंदवले-मोगराळे हद्दीत असलेल्या शिवराज हॉटेलजवळ भरधाव वेगातील वेरणा गाडी (क्रमांक एम एच ११ बी एल १११०) ने अचानक टायर फुटल्यामुळे नियंत्रण सुटून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात शिक्षक परहार हे गाडीवरून उडून बाजूच्या गवतात पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ फलटण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली.

माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. लक्ष्मण पिसे यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या परहार यांची भेट घेतली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!