व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड मुलाचे मित्र असल्याचे सांगुन त्याला लग्न पत्रिका द्यायची आहे असे सांगत घरात प्रवेश करून अज्ञात दरोडे खोरांनी कोयत्याचा धाक दाखवून वृध्द दांपत्यास मारहाण करून १लाख ९७ हजाराचा ऐवज लुटला या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिनांक 10/04/2024 रोजी रात्रौ 9:20 वा.चे सुमारास म्हसवड ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत रेस्ट हॉऊस समोर म्हसवड येथे राहत असलेल्या राजाराम गणपत केवटे वय 72 वर्षे यांचे घरी चार अनोळखी इसमांनी आपआपसात संगणमत करुन घरात अनाधिकृत प्रवेश करुन कोयत्याचा धाक दाखवुन राजाराम केवटे व त्यांची पत्नी सौ सिंधु राजाराम केवटे यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून १लाख ५० रुपये किंमतीच्या ५० ग्रम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, ९०००/- रुपये किंमतीच्या ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,३००००/- रुपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन,२०००/- रुपये किंमतीचे कानातील १ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी,५०००/- रुपये किंमतीचे एक मायकल हिल कंपणीचे गोल्डन कलरचे हातातील घड्याळ,१००० रुपये किंमतीचे दोन की-पॅड असणारे आयटेल कंपणीचे मोबाईल असे एकूण १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, हातातील घड्याळ व मोबाईल फोन जबरीने चोरी करुन पत्नीच्या हाताला दुखापत करुन घेवुन गेले असल्या बाबत ची फिर्याद राजाराम गणपत केवटे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली अधिक तपास मा.सपोनि बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक ए.ए वाघमोडे करत आहेत