किरकसाल ता माण येथे जातीवाचक शिवीगाळ करुन मारहान केल्याप्रकरणी एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दहिवडी: प्रतिनिधी
                        किरकसाल ता माण येथील सुनिल लक्ष्मण सावंत यांना त्याच गावातील नवनाथ तुकाराम काटकर रा किरकराल ता. माण जि. सातारा यांनी जातीवाचक शिवीगाळ करून फळकुटाने मारहाण केल्याची घटना घडली असून त्याच्या विरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात अ.जा. अ.ज.  अत्याचार प्रतिबंधक अधिनीयम कलम  ३(१)(r),३(1)(s) 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,  सुनिल लक्ष्मण सावंत वय 48 वर्ष धंदा खाजगी नोकरी जात हिंदु चांभार मुळ रा. किरकसाल ता. माण जि. सातारा सध्या रा. रुम नं २०४सेक्टर २३ कृष्णा कॉपरेटीव्ह हौसींग सोसायटी, जुईनगर नवी मुंबई,  हे आपले गावी किरकसाल येथे कामानिमित्त आले असता दि.२७ रोजी संध्याकाळी ५.३० वाजणेच्या सुमारास त्यांच्या घरा समोर असणाऱ्या गेटवर दारूच्या नशेत नवनाथ तुकाराम काटकर याने दगड मारुन नुकसान केले, याबाबत त्याला दगड का मारला असे विचारले असता, नवनाथ काटकर यांनी त्यांना जाती वरून शिवीगाळ करून फळकुटाने मारहाण केली  व तुझे तुकडेच करतो असे म्हणुन जिवे मारणेची धमकी दिली यावेळी तिथे उपस्थित कामगार  मामासो खाशाबा जाधव, संतोष नारायण कुंभार, अमोल मोहन रसाळ यांनाही  शिवीगाळ व दमदाटी केली.
                याबाबत सुनील सावंत यांनी दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन दहिवडी पोलीसांनी नवनाथ तुकाराम काटकर याचेवर 869 /2023 IPC 324,427,452,504,506,510, अ.जा. अ.ज. अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1)(r ),3(1)(s) 3(2)(va) प्रमाणे आहे. गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास  अश्वीनी शेडगे सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो दहिवडी  कॅम्प वडुज   यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे हे करीत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!