पानवनमध्ये ग्रामविकासाचा नवा अध्याय! मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
पानवन, (ता. माण )–प्रतिनिधी

माण-खटावच्या विकासपर्वाचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते पानवन गावात विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले. या निमित्ताने पानवन ग्रामस्थांच्या वतीने भाऊंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या पारंपरिक लेझीम पथकाच्या स्वागताने झाली. नऊवारी साडी, फेटा आणि पारंपरिक मराठी वेशभूषेत विद्यार्थिनींनी मंत्री महोदयांचे जल्लोषात स्वागत करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या वेळी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पानवन येथील डिजिटल आयडियल क्लासरूम सेंटरचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येईल, शाळेची पटसंख्या वाढेल व या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडतील.”

त्यानंतर नवीन ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजन सोहळ्याद्वारे ग्रामविकासासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे सचिवालय ग्रामस्थांसाठी सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक केंद्र ठरणार आहे.

याच वेळी ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण देखील भाऊंच्या शुभहस्ते पार पडले. या मंडपासाठी देखील भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

 

पानवन ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि गावासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांचा ‘भव्य नागरी सत्कार’ करून कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचाही विशेष उल्लेख करत माण-खटाव भागातून दुष्काळाचा कलंक पुसून विकास घडवून आणल्याबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमास  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, जि.प. सदस्य अरुण गोरे (आबा), भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, जेष्ठ नेते हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले, आप्पासाहेब पुकळे, अकील काझी, चिन्मय कुलकर्णी, शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सरपंच जयश्री शिंदे, उपसरपंच चांगुणा शिंदे, आणि इतर मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!