सदाशिव गडावर बिबट्याचा वावर. सदाशिव मंदिरा पाठीमागे सीसीटीव्ही कॅमेरा बिबट्या कैद. नागरिकांमध्ये चर्चेला उधान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
सातारा कराड प्रतिनिधी ..
किल्ले सदाशिव गडावर बिबट्याचा वावर असल्याचे टीव्ही फुटेज वरून समोर आले आहे. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सदाशिव मंदिराच्या पाठीमागे च्या सीसीटीव्ही कॅमेरा लहान वासरू व गायीच्या भोवती बिबट्याचा वावर सीसी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे रात्री गडावर जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी आव्हान वन खात्याने केले आहे.
सदाशिवगड पायथ्याशी असलेल्या राजमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा घटना समोर आले आहेत. सदाशिवगड ते सागरेश्वर अभयारण्य अखंड डोंगररांग असल्यामुळे पाणी व भक्षकाच्या शोधात सुरली घाट परिसरात येतात. सुली घाटानजीक राजमाची पाझर तलाव आहे या पाझर तलाव्यात बारा महिने पाणी असते तलाव नजीक व दाट झाडीमध्ये प्राण्यांचा वावर दिसून आला आहे. अनेक वेळा नागरिकांना बिबट्याचा वावर दिसून आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सदाशिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत गाई व गाढव उभे होते. बाबर माचीच्या बाजू कडून बिबट्या गडावर आल्याचे सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. गडावर पुजारी वास्तव असतात आठवड्यातील काही दिवस नागरिक ही गडावर वास्तव्यास असतात. पायथ्यापासून ते गडापर्यंत लाईटची सोय असल्यामुळे रात्री च्या वेळी सुद्धा नागरिकांची गडावर येणे जाणे सुरू असते. सकाळच्या पारी दर्शनासाठी व व्यायामासाठी नागरिकांची गर्दी असते. फुटेज सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे वन खात्याने खबरदारी घेण्याची सूचना केली आहे या घटनेमुळे वन्य प्राणी निसर्गाचा जंगलाचा घात यामुळे मनुष्यवस्तीत सुद्धा बिबट्या वावर घटना समोर येत आहेत.