शिंपी समाजाच्या विश्व महा संमेलनासाठी साताऱ्यातील शिंपी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने श्री संत नामदेव महाराज यांचा जयघोष करत नागपूरकडे प्रस्थान 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 
म्हसवड:-प्रतिनिधी
     शिंपी समाजाचे 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे विश्व महासंमेलन होणार असून या संमेलनासाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिंपी समाज बांधवांनी नासपचे जिल्हाध्यक्ष सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड येथून नागपूर कडे प्रस्थान केले
       22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्यातील मंत्री खासदार आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या शिंपी समाजाच्या विश्व महासमेंलनासाठी देशभरातून लाखो समाजबांधव एकत्र येत आहेत. राष्ट्रीय एकात्मता व संत नामदेवांच्या विचारांचा प्रसार हा या महासमेंलनाचा प्रमुख उद्देश असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने समाजबांधव रवाना झाले आहेत.
       नामदेव समाज सातारा जिल्हा अध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंपी समाज बांधव-भगिनी नागपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. या पार्श्वभूमीवर म्हसवड येथून एक बस रविवार दि.19 रोजी सकाळी उत्साहात रवाना झाली.
      या वेळी शहरातील माजी नगराध्यक्ष नितीन दोशी संजय भागवत करणभैय्या पोरे बाळासाहेब पिसे, इम्रान मुल्ला, पत्रकार अहमद मुल्ला, पोपट बनसोडे-पाटील, आदींसह प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. घोषणाबाजी, जयघोष आणि संत नामदेव महाराजांच्या जयजयकारात वातावरण भारावून गेले होते.
सदर महासमेंलनामुळे समाजातील एकोपा, संघटनबळ व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल,असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *