म्हसवड येथील श्री सिद्धनाथ रथाची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण याला रथाचे तोंड फिरवणे असे म्हणतात.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ( प्रतिनिधी )
म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे २ डिसेंबर रोजी होत आहे, या रथोत्सवाची खरी सुरुवात आज कार्तीक शुध्द एकादशीच्या दिवसापासुन होत असते, एकादशी दिवशी श्रीं चा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकर्यांच्या उपस्थितीत काढला जातो
ही येथील परंपरा असुन या परंपरेनुसार आज मंगळवार दि. २६ रोजी रथ गृहाबाहेर येथील राजेंच्या उपस्थितीत काढत त्याचे पुजन सिध्दनाथाचे सालकरी, मठादिपती, मानकरी व राजेमाने परिवाराकडुन करून रथाची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
म्हसवड यात्रेच्या पार्श्वभुमिवर सोमवार दि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाची प्रशासन , श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट,शहरवासिय, मानक-यांनी जोरदार तयारी केली आहे.
श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस म्हणजे सोमवार दि. २ डिसेंबर रोजी वधू-वराची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे. यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या यात्रा नियोजनासाठी पालिका व प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
. या रथोत्सवासाठी एकादशी च्या दिवशी यात्रा पटांगणावरिल रथगृहातुन रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर काढुन तो सजवण्याच्या लगबगी सुरु झाल्या आहेत. यावेळी रथाचे मानकरी म्हसवडचे राजे राजेमाने, माळी, लोहार, सुतार, गुरव आदी समाजातील मानक-याच्या उपस्थितीत हा रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला.
यावेळी श्री सिध्दनाथ मंदिराचे सालकरी महेश गुरव, मठाधिपती रविनाथ महाराज, रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजेमाने, श्रीमंत शिवराज आबासाहेब राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजीत राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने आदी मानक-यासह माळी, लोहार, सुतार, गुरव समाजातील मानकरी उपस्थित होते.
========================
यात्रा पंटागणावर लगबग – आजपासुन खऱ्या अर्थाने सिध्दनाथ यात्रेस सुरुवात होत असुन पुढील ६ व्या दिवशी २ डिसेंबर रोजी येथील रथोत्सव संपन्न होणार आहे, त्यामुळे यात्रा पटांगणावर व्यावसायिकांची दुकाने लावण्यासाठी व माल तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे.