जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड नगरपरिषदेच्या ठेका कर्मचाऱ्यांनी जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी केलेल्या सेवा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मतदान हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक मतदाराला सहज आणि सुलभ पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी ठेका कर्मचारी श्री. गणेश मधुकर म्हेत्रे, श्री. धिरज रेवणनाथ खंदारे आणि सफाई कर्मचारी श्री. संजय गोरख जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरी जाऊन मतदान केंद्रावर आणले आणि परत त्यांच्या घरी पोहोचवले. ही सेवा संपूर्णतः विनामूल्य असून, त्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.


