खेळातूनही मिळते वेगळी संधी     …….. नितीन तारळकर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
    म्हसवड ….प्रतिनिधी.
अभ्यासाबरोबरच शालेय जीवनात खेळाला प्राधान्य दिल्यास एक वेगळी संधी मिळू शकते असे प्रतिपादन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी म्हसवड येथे केले.
      सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी नुकतीच
 क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी  त्यांचा सन्मान करून स्वागत केले.
    यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर म्हणाले माण तालुक्याला क्रीडा विषयक चांगला वारसा आहे.विविध शालेय खेळात माण तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवलेली आहे.ललिता बाबर यांच्यासारखी सामान्य घरातील मुलगी ऑलम्पिक स्पर्धेपर्यंत जागतिक स्तरावर पोहोचली.या माध्यमातून ललिता बाबर यांना चांगली नोकरी मिळाली.या व अशा अनेक खेळाडू कडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.शालेय जीवनापासूनचअभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा महत्त्व देणे गरजेचेअसल्याचे तालुक्याने स्पष्ट केले.
 पुढे बोलताना तारोळकर म्हणाले खेळ व पदक या बरोबरच क्रीडा स्पर्धेमधून उत्कृष्ट शरीर स्वास्थ्य  घडू शकते व नोकरी बरोबरच जीवनाचा एक यशस्वी मार्ग मिळू शकतो.केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण विद्यार्थ्याला पोषक असणाऱ्या विविध खेळाला  मान्यता दिलेली आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी  रोप स्किपिंग खेळामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत घेतलेली  यशस्वी गरुड झेप होय.  राज्य व राष्ट्रीय खेळाडू कडून प्रेरणा घ्या.जीवनात संघर्ष व कष्टाशिवाय  काहीही सहज शक्य होणार नाही याची जाण ठेवा .बौद्धिक प्रगती बरोबरच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल क्रीडा अधिकारी तारळकर यांनी संस्था व्यवस्थापन व क्रीडा शिक्षक यांचेअभिनंदन केले.
         यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,  संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर   जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष वीरभद्र गावडे, एन आय  कुस्ती कोच महालिंग खांडेकर, प्राचार्य राहुल फुटाणे ,कोंडीबा वीरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांनी प्रास्ताविक करून क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल मधील क्रीडा विषयक उपक्रमाची माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांचे आभार क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे यांनी व्यक्त केले .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!