व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड : धुळदेव (ता. माण) येथील पत्रकार सचिन नारायण शिंगाडे, त्यांचे मित्र विलास राजाराम कोळेकर हे दोघे गावातील धुळोबा यात्रेनिमित्त देवदर्शन, बातमी करण्यासाठी मंदिरात गेले होते त्यावेळेस देवाचा छबिना निघाला असता काही महिलांच्या अंगात आले होते. त्यावेळी सचिन शिंगाडे हे देवाच्या यात्रेची बातमी प्रसारित करण्यासाठी येणा-या, जाणाऱ्या भाविकांचे शूटिंग करत असताना आरोपी पोपट मासाळ, लाला मासाळ, यांनी शूटिंग का करतोयस असे म्हणून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तोंडावर मारहाण केली.
या मारहाणीमध्ये पत्रकार सचिन शिंगाडे यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊन जखमी झाले. घडलेला हा प्रकार तात्काळ म्हसवड पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी या चारजणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे.