म्हसळा तालुक्यातील मोबाईल टॉवरच्या बॅंटरी चोरी करणाऱ्या ५ चोरट्यांना म्हसळा पोलिसांनी चोरीची खबर मिळताच अवघ्या काही वेळातच अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि काल रात्री (दि २५/०७/२०२४) १२.३० च्या सुमारास एअरटेल कंपनीचे म्हसळा तालुक्याचे व्यवस्थापक प्रमोद शिवाजी खाडे यांना त्यांच्या मोबाईल वर तालुक्यातील जांभूळ येथील त्यांच्या मोबाइल कंपनीच्या टॉवरच्या बॅंटरी डीसकनेक्ट झाल्याचे नोटीफिकेशन आले . त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच म्हसळा पोलीस ठाण्यात याबाबत कळविले . याची खबर मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी आपल्या कर्मचाऱ्या समवेत जांभूळ येथील घटनास्थळी पोहचले. व मोठ्या शिताफीने घटनास्थळी बॅंटरी चोरी करणाऱ्याराधेश्याम सत्यनारायण यादव, साधू आधी यादव, मोहम्मद फारूक रो. चौधरी, सतीश रमेश शुक्ला , व अन्य एक अशा ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या .
सदर आरोपींकडून म्हसळा पोलिसांनी रु. ४ लाख किमतीच्या तब्बल ४० बॅंटरी हस्तगत केल्या. पाचही आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ७६/२०२४ कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर डी.व्ही एडवळे करीत आहेत.