कोर्टी येथील अपघात प्रकरणी ठेकेदार व साईड इन्चार्ज वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उंब्रज पोलीस स्टेशन कडे निवेदनाद्वारे मागणी
कोर्टी तालुका कराड येथील अपघात प्रकरणी महामार्गाचे ठेकेदार व साईड इन्चार्ज यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय भोसले व कोर्टी चे उपसरपंच सुजित यादव यांनी उंब्रज पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की कोर्टी येथे झालेल्या अपघात हा ठेकेदार व साईड इन्चार्ज यांच्या चुकीमुळे झाला असून या ठिकाणी कराड येथील मायलेकींना आपले प्राण गमवावे लागले आहेत . त्याचबरोबर अनेकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. त्यासंबंधी 1/9/ 2024 रोजी उभाटा गटाचे संजय भोसले यांनी भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो त्याचे सविस्तर निवेदन दिले होते. परंतु त्याकडे संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच या ठिकाणी कराड येथील मायलेकींना आपला जीव गमवावा लागला. त्यासाठी संबंधित ठेकेदार व साईड इनचार्ज जबाबदार असून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय भोसले उपसरपंच सुजित यादव, सुरज यादव, कैलास पिसाळ, दिग्विजय थोरात ,शिवाजी थोरात, संदीप थोरात शंकरराव घारगे, गजानन देशमाने ,यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोर्टी ता कराड येथे घडलेल्या अपघातामध्ये दोन माया लेकींना आपला प्राण गमवावा लागला आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून स्थानिक नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन ठेकेदार व साईट इन्चार्ज वर त्वरित पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिक करत आहेत.