बेकायदेशीर जमाव करून गंभीर मारहाण केल्या प्रकरणी सात जणावर   दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड: प्रतिनिधी

माण तालुक्यातील वारुगड येथील घोडेवाडी गावात ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास . जुन्या वादाचा राग मनात धरून सात जणांनी संगनमताने तक्रारदार यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर त्यांच्या पतीवर हल्ला केल्याचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सौ. भारती विलास पवार (वय ३७, रा. घोडेवाडी, वारुगड, ता. मान, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी जळणाच्या व कळकाच्या लाकडी काठ्यांनी तसेच हाताने लाथाबुक्क्यांनी विलास नामदेव पवार यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, गुडघ्यावर, दोन्ही हातांच्या कोपरांवर व मांडीवर गंभीर दुखापत झाली असून तोंडावर मारल्याने समोरील खालचे दोन दात पडले आहेत. मारहाणीनंतर शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

या घटनेप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये सात जणावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये  मुगुटराव उदयसिंग मदने, उदयसिंग मल्हारी मदने, निलेश ऊर्फ आबा जगन्नाथ जाधव, गणेश महादेव जाधव, तुषार मधुकर मदने, महादेव मोतीराम जाधव व पंडित भगवान जाधव (सर्व रा. वारुगड, ता. माण, जि. सातारा) यांची नावे नमूद आहेत.

गुन्हा १२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजून ९ मिनिटांनी दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेबाबत तजवीज ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास   सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विठ्ठल दगडू विरकर करत  आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *