विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवड पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
मानसिक जाचाला कंटाळून पानवण, ता. माण येथील मोना उर्फ आकांक्षा संदीप लोखंडे (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येप्रकरणी म्हसवड पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत म्हसवड पोलीसठाण्यातून मिळालेली माहिती अशी .
पाणवण ता.माण जि.सातारा गावी पती संदिप रघुनाथ लोखंडे, सासरा रघुनाथ सुखदेव लोखंडे, सासु उषा रघुनाथ लोखंडे सर्व रा.पाणवन ता.माण जि.सातारा यांचे जाचाला व मानसिक त्रासाला कंटाळुन मोना उर्फ आकांक्षा संदिप लोखंडे वय 22 वर्षे हिने (दि ४ )रोजी संध्या ६ वाजनेच्या दरम्यान तिचे सासरी राहते घरातील पत्र्याचे खाली असणारे लोखंडी अँगलला साडीचे सहाय्याने गळफास लावुन घेवुन आत्महत्या केली तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती संदीप रघुनाथ लोखंडे, सासरा रघुनाथ सुखदेव लोखंडे व सासू उषा (तिघे रा. पानवण) यांच्याविरोधात . आकांक्षाचे वडील अविनाश राजेंद्र कसबे (वय ४५, रा. सुस्ते, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून .मा.सपोनि भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो ह. कुऱ्हाडे अधिक तपास करत आहेत