दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोधवडे गावात एका अनोळखी पुरुषाचा खून झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा मौजे लोधवडे तालुका माणगाव येथील झिरपाडी शिवारातील वनविभागाच्या गट नंबर 401 मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. मृत इसमाचा अंदाजे वय 32 ते 37 वर्षे आहे, व त्याच्या डोक्यावर ठिकठिकाणी गंभीर मार लागल्याने खून झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
खबरीवरून 14 ऑक्टोबर रोजी रात्री 9:52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी अनिल मल्हारी लोखंडे (वय 47 वर्षे, धंदा – पोलीस पाटील लोधवडे ) यांनी ही माहिती दिली. सदर प्रकरणात आरोपी अद्याप अज्ञात असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासास कामी वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. समीर शेख, मा. वैशाली कडूकर, मा. अश्विनी शेंडगे आणि मा. पानेनावकर घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अक्षय सोनवणे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सदरच्या मयत अनोळखी पुरुषाबद्दल कोणाला काही माहिती असेल तर त्वरित दहिवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले आहे