व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड –
माण तालुक्यातील उत्तरेकडील एका गावात म्हसवड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना समजतात म्हसवड पोलिसांनी संशयित नाराधमाला तात्काळ अटक केली
म्हसवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका गावात ही घटना घडली असून या गावातील इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमुरडी आईसह राहत असून दि२७ डिसेंबर रोजी आई काही कामानिमित्त जवळच्या गावी गेली होती ही माहिती समजताच गावातील ५० वर्षाच्या नराधमाने ही संधी साधून काही कारणाने तो त्या मुलीच्या घरी आला त्यावेळी घरात लहान मुलगा आणि ती मुलगी होती त्या नराधमाने घरात जाऊन मुलीला दमदाटी करत तिच्यावर अत्याचार केला व ही घटना कोणाला सांगू नको म्हणून दमदाटी केली
दोन दिवसानंतर सदर मुलीला त्रास होऊ लागला त्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केली असता ही गंभीर घटना आईच्या लक्षात आली सदर पिडीत चिमुरडीला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर मुली सोबत अत्याचार झाले असल्याचं स्पष्ट झालं यानंतर म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी आपल्या टीम सह तात्काळ सूत्र फिरवत संशयित नराधमाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने याबाबतची कबुली दिली आहे. संबंधित पन्नास वर्षाच्या संशियतावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सपोनी सखाराम बिराजदार यांनी सांगितले आहे.