शहीद सैनिकांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ‘SR बाजार’ची स्थापना
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावचे सुपुत्र भारतीय सैन्यातील शहीद वीर जवान सचिन बावडेकर आणि राहुल घोडके हे जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पावले. हे दोन्ही सैनिक श्री. आरीफ मुजावर यांचे वर्गमित्र होते. शिक्षणाच्या काळात एकत्र राहिलेल्या या मित्रांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान कायम स्मरणात राहावा, यासाठी श्री. मुजावर यांनी ‘SR बाजार’ची स्थापना केली.
या उपक्रमाच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांचा — वीर माता व वीर पितांचा — विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत कदम यांनी सर्व आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने श्री. मुजावर यांच्या या अनमोल कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व सन्मानित केले.
कार्यक्रमाला सैनिक फेडरेशनचे कराड तालुका अध्यक्ष श्री. सदाशिव नागणे, कराड दक्षिण अध्यक्ष श्री. चंद्रकांत (बापू) साठे, श्री. रामभाऊ सातपुते, वीर माता-पिता, माजी सैनिक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.