संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा – नामदेव समाज शिंपी परिषदेचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड │ प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या रविवार, २७ जुलै रोजी पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नामदेव समाज शिंपी परिषदेचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, कार्यक्रमात केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर सोहळा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक न राहता, समाजातील ऐक्य, एकता आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नामदेव समाजातील शिंपी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले आहे.
संत नामदेव महाराज यांची शिकवण आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार असल्याचेही आयोजकांनी नमूद केले.