म्हसवडमध्ये ‘आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नूतन इमारतीचे ’ आज सायं. ५ वाजता भव्य उद्घाटन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हसवड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर’ या सुसज्ज आरोग्य केंद्राचे उद्घाटन आज शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार भगवानराव गोरे (भाऊ) उपस्थित राहणार आहेत.
या विशेष समारंभाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये:
मा. श्रीम. याशनी नागराजन (IAS) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा
मा. श्री. संतोष पाटील (IAS) – जिल्हाधिकारी, सातारा
मा. श्री. प्रदीप शेंडगे – गटविकास अधिकारी, पंचायत समिती माण (दहिवडी)
मा. डॉ. महेश खलिपे – जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सातारा
मा. डॉ. लक्ष्मण कोडलकर – तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती माण
मा. डॉ. योगेश कुलकर्णी – वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड
या नव्या आरोग्य मंदिरात प्रथितयश सुविधा, डिजिटल आरोग्य सेवा, बाल व मातृ संगोपन सेवा, लसीकरण, तपासणी कक्ष आणि प्राथमिक उपचार यांचा समावेश आहे. यामुळे म्हसवड व परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी स्थानिक आरोग्य विभाग, पंचायत समिती माण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आज संध्याकाळी ५ वाजता या भव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड
तालुका माण, जिल्हा सातारा