पेठ शिवापूर येथे संत नामदेव महाराज संजीवन सोहळा उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड /मोरगिरी प्रतिनिधी –
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त पेठ शिवापूर मोरगिरी येथे दिनांक 17 जुलै ते 23 जुलै 2025 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हा संपूर्ण सप्ताह अत्यंत भक्तिमय वातावरणात, मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडला.

या सप्ताहात दररोज सकाळी मंदिरामध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण वाचन, हरिपाठ व विविध कीर्तन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. साक्षी महाराज सुर्वे, शिरीष महाराज डोंगरे (मिरज), राम महाराज राक्षे आणि नंदकुमार कालेकर (दापोली) यांच्या ज्ञानमय कीर्तनांनी परिसरात भक्तिरस सागर भरून वाहिला.

याच कार्यक्रमांतर्गत, ह.भ.प. दत्तात्रय महाराज गाढवे (सातारा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शालांत परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये कुमारी समृद्धी वैषाली किशोर हिरवे (SSC बोर्ड, मोरगिरी केंद्र) व कुमारी ऐश्वर्या सरिता महादेव हिरवे (M.Sc. मायक्रोबायोलॉजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांचा सत्कार ह.भ.प. राम महाराज राक्षे यांच्या हस्ते 22 जुलै रोजी करण्यात आला.

23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता दिंडी सोहळा पार पडला. त्यानंतर 12.05 वाजता संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री गजानन सेवा मंडळ व श्री संत नामदेव शिंपी समाज, पेठ शिवापूर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये ग्रामस्थ श्री गजानन राजाराम फुटाणे, श्री किशोर दिलीप हिरवे, श्री प्रकाश तुकाराम फुटाणे, गंगाराम गणपती हिरवे, श्री शशिकांत प्रभाळे, नामदेव साळी, श्री मिलिंद राऊत, दत्तात्रेय फुटाणे, श्री निलेश हिरवे, श्री महेश हिरवे, श्री धनंजय हिरवे, नामदेव नाझरे, शुभम नाझरे, प्रसाद अवसरे, सोमनाथ हिरवे, चेतन हिरवे यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच इंचगिरी संप्रदाय मंडळ, मोरणा विभाग यांनीही विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नासपचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी सर्व आयोजक, ग्रामस्थ आणि भक्तमंडळींचे अभिनंदन केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!