दिवडचा डॉ. अभिजीत सावंत वाळूचोरी प्रकरणी अडचणीत 🔹 म्हसवड पोलिसांची कारवाई – २७ लाखांचा डंपर आणि वाळू जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी

माण तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून म्हसवड पोलिसांनी दिवड येथील व्हेटर्नरी डॉक्टरच्या डंपरवर छापा टाकत तब्बल २७ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात डॉ. अभिजीत संजय सावंत (रा. दिवड) आणि डंपर चालक नितीन सुभाष लोखंडे (रा. विरकरवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसवडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना शिरताव–देवापूर मार्गावरून एक डंपर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथक रवाना करत कारवाईचे आदेश दिले. शिरताव गावाजवळील लक्ष्मी देवी मंदिर परिसरात संशयास्पद डंपर थांबवण्यात आला. तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल तीन ब्रास वाळू भरलेली आढळून आली.

डॉक्टरच वाळू माफिया?

पोलिसांनी वाहन व वाळू जप्त करून डंपर चालक नितीन लोखंडे आणि डंपर मालक डॉ. अभिजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा डंपर आणि वाळू मिळून एकूण मुद्देमालाची किंमत ₹२७,१८,००० एवढी आहे. डॉक्टरसारख्या सुशिक्षित व्यक्तीकडून अवैध वाळू व्यापार केल्याची बाब समोर आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या कार्यवाहीमुळे वाळू माफियांना हादरा

म्हसवड पोलिस स्टेशनने अवैध वाळू वाहतुकीवर पुन्हा एकदा कठोर पाऊल टाकल्यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे, पो.ना. जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादले, संतोष काळे, आणि विनोद सपकाळ यांचे विशेष योगदान आहे.

या कारवाईस वरिष्ठ पोलीस अधिकारी, सातारा यांचे मार्गदर्शन लाभले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!