शिवसेनेतर्फे दिंडीतील वारकऱ्यांना प्राथमिक सुविधा.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड…. प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या अनेक दिंडीतील वारकऱ्यांना म्हसवड येथे माण तालुका शिवसेनेतर्फे विविध स्वरूपातील प्राथमिक सुविधा व अल्पोपहार खाऊचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक कार्याला पाठबळ देण्यासाठी माण तालुका शिवसेनेतर्फे दिंडीतील वारकऱ्यांची सेवा व अल्पोपहार वाटपाचा उपक्रम म्हसवड येथे आयोजित केला होता. राज्य शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , माण तालुका शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब मुलाणी, युवा सेना अध्यक्ष हनुमंत राजगे, म्हसवड शहराध्यक्ष वैभव गुरव यांचे सह पंत मंडले, अनिल मासाळ, दाऊद मुल्ला, सुरेश झगडे, अभिषेक कीर्तने, जयेश गोंजारी, निखिल सुतार, सतीश जठार या पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या चार दिंडीतील अंदाजे दोन हजार वारकऱ्यांना अल्पोपहार व प्राथमिक सुविधांची सेवा शिवसेना पदाधिकारी यांचे मार्फत देण्यात आली. शिवसेना सातारा जिल्हा प्रभारी शरद कणसे, सह प्रभारी एकनाथ ओंबळे, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल अनेक वारकऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.