जिल्हास्तरीय युनिफाईट कराटे, जंप रोप, मर्दानी स्पर्धेत गोपालकृष्ण विद्यालयाचे सुवर्ण यश*
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
सादिक शेख
सातारा
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा यांच्या वतीने मालगाव येथे जिल्हास्तरीय कराटे, जंपरोप व मर्दानी स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते.
मा. डॉ.श्री संदीपभाऊ शिंदे अध्यक्ष गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा श्री.सुनील जाधव सर उपाध्यक्ष श्री.नितीन सुरवसे सचिव गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा श्री. अजित वाडकर जंप रोप असोसिएशन सातारा जिल्हा अध्यक्ष, श्री. अविनाश गोंधळी रेनबुकान कराटे डो.असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, डॉ.श्री.अमित गडांकुश छावा शिवकालीन बहुउद्देशीय कला मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या सर्व मान्यवरांनी गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय युनिफाईट कराटे स्पर्धा, जिल्हास्तरीय मर्दानी स्पर्धा व जिल्हास्तरीय जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुवर्ण यश प्राप्त केले वसीम शेख (युनिफाईट कराटे) सुवर्णपदक, कु.अमृता फडतरे जंपरोप सुवर्णपदक, कु.रोशनी अवघडे जंपरोप सुवर्णपदक, कु.केतकी गेंड जंपरोप सुवर्णपदक, कु.संचिता गाढवे जंपरोप सुवर्णपदक, कु.ऋतिका तुपे जंपरोप सुवर्णपदक, कु.वेणू गेंड जंपरोप सुवर्णपदक प्राप्त केले या सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री.सादिक शेख सर , श्री.विजयकुमार अवघडे, आदिनाथ शिंदे, अजिंक्य अवघडे,यांचे मार्गदर्शन लाभले दिनांक 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सर्व यशस्वी खेळाडूंचा सुवर्णपदक प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री. दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी खेळाडूंनी आर. एस. पी. च्या वतीने
ए. पी.आय. मा. श्री दत्तात्रय दराडे साहेब यांना मानवंदना देऊन बक्षीस स्वीकारले. या सत्कार समारंभास विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक मा. श्री. नदाफ एन.डी.सर श्री. माने पी. जे.,श्री.बोंगे एस. डी., श्री. राठोड के.बी.,श्री. गायगोले पी. व्हि.,श्रीम गायकवाड पी.आर.,श्री.घाटगे पी.एस.,श्री. खाडे एस.बी.सर्व शिक्षक सहकारी शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण विभाग अधिकारी, संस्था पदाधिकारी, मॅनेजर कौन्सिल सदस्य, स्कूल कमिटी, सर्व देणगीदार, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, माता-पालक संघ, शिक्षक पालक संघ, सर्व पालक, आजी-माजी विद्यार्थी, गोंदवले खुर्द विकास मंडळ मुंबई, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थ गोंदवले खुर्द व पंचक्रोशी यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.