सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस शिक्षा : वडूज न्यायालयाचा निर्णय

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)

सादिक शेख
दहिवडी : प्रतिनिधी
सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी भांडवली (ता. मान) येथील गणेश शामराव खरात (वय 36) याला अति. जिल्हा व सत्र न्यायालय वडूज यांनी दोषी ठरवले असून भा.दं.वि. कलम 353 अन्वये 1 वर्ष सक्त मजुरी व 1,000 रुपये दंड (दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद) तसेच भा.दं.वि. कलम 323 अन्वये 3 महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.

हा प्रकार दि. 20 मे 2017 रोजी दुपारी 12 वाजता भांडवली येथे घडला. यावेळी फिर्यादी पो.ना. सुनील साहेबराव राऊत (ब.नं.780) हे गुन्हा तपासण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी गेले होते. दरम्यान आरोपी गणेश खरात हा समोरील लोकांशी अर्वाच्य भाषेत वागत होता. त्यास समजावून सांगत असताना त्याने फिर्यादीच्या कानफडात मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. 155/2017 अन्वये भा.दं.वि. कलम 353, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पो. उप. नि. पी.एन. इंगळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून दोषारोपपत्र वडूज न्यायालयात दाखल केले.

सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध साक्ष व पुराव्यांच्या आधारे मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एन.एस. कोलेसो यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

या खटल्याच्या यशस्वी सुनावणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अश्विनी शेंडगे, स.पो.नि. डी.पी. दराडे (दहिवडी पोलीस ठाणे) यांचे मार्गदर्शन लाभले. प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पो. उप.नि. दत्तात्रय जाधव, म.पो.ह. विजयालक्ष्मी दडस, पो.कॉ. अमीर शिकलगार, पो.कॉ. सागर सजगणे, पो.कॉ. जयवंत शिंदे यांनी तपास व न्यायालयीन कामकाजात मोलाचे सहकार्य केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!