सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

बिदाल, ता. माण, जि. सातारा
सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती माण व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बिदाल यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवार, १२ डिसेंबर २०२४ ते शनिवार, १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बिदाल येथे संपन्न होणार आहे.

उद्घाटन समारंभ

उद्घाटन समारंभ गुरुवार, १२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता होईल. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. आ. श्री. जयकुमार गोरे, सदस्य, विधानसभा महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती असेल, तर उद्घाटक म्हणून मा. श्री. अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना), जि.प. सातारा हजर राहतील.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रविंद्र खंदारे (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक), श्रीमती शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), श्री. विकास अहिर (तहसीलदार, माण), श्री. प्रमोद जगदाळे (लोकनियुक्त सरपंच, बिदाल), श्री. रमेश गंबरे
(शिक्षण विस्तार अधिकारी)
श्री. लक्ष्मण पिसे(गटशिक्षणाधिकारी,)
श्री. नंदकुमार दंडिले (शिक्षण विस्तार अधिकारी) आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे

मुख्य विषय: शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

उपविषय:

1. अन्न, आरोग्य आणि स्वच्छता
2. वाहतूक आणि दळणवळण
3. नैसर्गिक शेती
4. आपत्ती व्यवस्थापन
5. गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार
6. कचरा व्यवस्थापन
7. संसाधन व्यवस्थापन

कार्यक्रमाचे वेळापत्रक:

गुरुवार, १२ डिसेंबर २०२४:
सकाळी १०:३० ते १:३० – उपकरण नोंदणी
दुपारी २:०० – उद्घाटन समारंभ
शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४:
सकाळी १०:०० पासून – प्रदर्शन खुले
दुपारी १२:०० ते १:३० – निबंध स्पर्धा
दुपारी २:०० ते ३:०० – प्रश्नमंजुषा
दुपारी ३:०० ते ४:०० – वक्तृत्व स्पर्धा
दुपारी ४:०० ते ५:०० – मूल्यांकन

शनिवार, १४ डिसेंबर २०२४:

सकाळी १०:०० पासून – प्रदर्शन खुले
सकाळी १०:०० ते १२:०० – उपकरण मूल्यांकन
दुपारी १:०० ते २:०० – सांस्कृतिक कार्यक्रम
दुपारी ३:०० ते ५:०० – बक्षिस वितरण व समारोप
सायंकाळी ५:०० – उपस्थिती पत्रक वाटप

समारोप समारंभ व बक्षिस वितरण:

समारोप समारंभ शनिवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. या समारंभाचे अध्यक्षस्थान मा. श्रीमती. अश्विनी शेंडगे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कॅम्प वडूज) भूषवतील.

कार्यक्रमास मा. श्रीमती उज्वला गाडेकर (उपविभागीय अधिकारी, माण-खटाव), मा. श्री. प्रदीप शेंडगे (गटविकास अधिकारी), श्री. अक्षय सोनवणे (सहा. पोलीस निरीक्षक), श्रीमती प्रभावती कोळेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहील.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे विविध प्रकल्प, मॉडेल्स सादर होणार असून विज्ञान विषयक स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

सर्वांनी या प्रदर्शनास भेट द्यावी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!