म्हसवडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन – सामाजिक बांधिलकीची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या पोरे कुटुंबाचा पुढाकार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड: प्रतिनिधी
म्हसवड येथे इंजिनिअर सुनील पोरे आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करणभैय्या पोरे या पिता-पुत्राच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 11 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे शिबिर शुभम भारतगॅस एजन्सीच्या प्रांगणात पार पडणार असून, या उपक्रमात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जनश्री फाउंडेशनचे ऍड. शुभम पोरे यांनी केले आहे.


