मरगळवाडीचे सुपुत्र पोपट शिंगाडे यांना ‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
माण तालुक्यातील वळई मरगळवाडीचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त नायब सुभेदार व सध्या माण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोपट सीताराम शिंगाडे यांना ‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दिल्ली येथील इंडिया इस्लामिक सेंटरमध्ये भारत गौरव समिती आणि कालीरमण फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार धर्मवीर चौधरी यांच्या हस्ते शिंगाडे यांना सपत्नीक हा सन्मान प्रदान करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीतून उभा राहिलेला यशस्वी प्रवास

कायम दुष्काळी असलेल्या मरगळवाडी गावातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोपट शिंगाडे यांचा जन्म झाला. कुटुंब ऊसतोड कामगार, वसईला मातीकाम, मेंढपाळ, तसेच रंगकाम करत जगत होते. मात्र, या बिकट परिस्थितीतही शिंगाडे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल केली. शिक्षण घेतानाच त्यांनी भारतीय लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकार केले.

लष्करात 18 वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांनी महसूल विभागात कार्यरत राहून समाजसेवेत सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः कोरोना काळात अनेक कुटुंबांना त्यांनी दिलेला मदतीचा हात समाजकार्याचे अप्रतिम उदाहरण ठरला.

पोपट शिंगाडे यांना मिळालेल्या या मानकऱ्याबद्दल माण-खटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिंगाडे यांच्या कार्यामुळे माण तालुक्याचा नावलौकिक वाढला असून, त्यांचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!