बळीराज सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचे दुःखद निधन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसळा – सुशील यादव

बळीराज सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष,कुणबी समाज नेते कृष्णा कोबनाक यांचे आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी ठाणे येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.निधना समयी त्यांचे वय ६३ वर्षे होते.त्यांच्या निधनाची वार्ता म्हसळा तालुक्यात अचानक-एकाएक समजताच हळहळ व्यक्त होत आहे.

  कृष्णा कोबनाक यांनी नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक बळीराज सेनेतर्फे लढवली होती.या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.सुरवातीच्या काळात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांशी प्रेरित होऊन शिवसेनेत काम केले.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम केले.नव्याने सामाजीक स्तरावर स्थापित झालेल्या बळिराज सेनेचे उपाध्यक्ष पदावर काम करीत होते.मनमिळावू,संयमी,कुशलसंघटक,अजातशत्रू,युवकांचे आशास्थान म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परीवार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!