माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचार सभेला गावात जोरदार प्रतिसाद मिळाला. पुळकोटी येथे आयोजित प्रचार सभेत प्रभाकर घार्गे यांच्यासमोर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व माण-खटावचे ज्येष्ठ नेते अनिलभाऊ देसाई यांनी गावकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणांवर प्रकाश टाकत घार्गे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
अनिलभाऊ देसाई यांनी बोलताना, “प्रभाकर घार्गे हे एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणारे नेते आहेत. त्यांनी नेहमीच शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी संघर्ष केला आहे. त्यांना विधानसभेत पाठवले तर तालुक्याच्या विकासाला नवे परिमाण मिळेल,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील विविध नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुळकोटी गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत घार्गे यांना आपला पाठिंबा दर्शवला.
प्रभाकर घार्गे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले, “माझा लढा हा जनतेच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाला मतदान करावे, म्हणजेच महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करूया.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेनंतर गावकऱ्यांनी प्रभाकर घार्गे यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या अपेक्षा मांडल्या.
महाविकास आघाडीचा प्रचार मोहीम गावागावांत उभारली जात असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत प्रभाकर घार्गे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज