व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी
व्यक्ती पेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असते अन म्हणूनच त्या राष्ट्रातील लोक कसा विचार करतात, यावर त्या राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. याकरिता गरज भासते ती योग्य विचार योग्य वयातच रुजविण्याची. या दृष्टिकोनातून स्काऊट चळवळ मुला-मुलींच्या तना -मनावर योग्य संस्कार रुजवून उपक्रमशील व्यक्तिमत्व घडविण्याचा निरंतर प्रयत्न करीत आहे.
स्काऊट गाईड ही जागतिक चळवळ असून मुला -मुलींचा शारीरिक,मानसिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास घडविणे हा चळवळीचा मुख्य उद्देश आहे.अशा या जागतिक स्काऊट गाईड चळवळीस 75 वर्षे पूर्ण झाल्याने 75 वा वर्धापन दिन सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल आणि लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि ध्वज स्टिकर चे अनावरण करण्यात आले.मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या या शैक्षणिक उपक्रमाची नितांत गरज आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्तरापर्यंत ही चळवळ पोहचावी आणि ही चळवळ समाजाभिमुख व लोकप्रिय व्हावी हा उद्देश वर्धापन दिन साजरा करण्यामागे आहे.यावेळी जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड)अरुंधती गुजर, ट्रेनर प्रताप माने, सुभाष कुंभार, देवेंद्र पुरंदरे, पोस्टमन जगदाळे,जिल्हा संघटक (गाईड)सविता भोळे, वरिष्ठ लिपिक सुनील खाडे आदी उपस्थित होते.
जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.)शबनम मुजावर, जिल्हा आयुक्त (गाईड)तथा शिक्षणाधिकारी (माध्य.)प्रभावती कोळेकर,जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)रविंद्र खंदारे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.