दहिवडी (प्रतिनिधी ) गोंदवले बु,( ता. माण), येथील अनिल रघुनाथ कदम, (वय 55 वर्षे )यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना आपल्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जान्यास मनाई केली म्हणून चिडून दत्तात्रय अरुण यादव यांनी अनिल कदम यांना लाथा बुक्क्यानी व काठीने मारहाण करून खून केला असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
गोंदवले बु,( ता. माण), गावचे हद्दीत मळवी नावचे शिवारातील तक्रारदार( शिवराज अनिल कदम, वय 26 वर्ष, रा. वरचामळा गणपती मंदिराजवळ गोंदवले बुद्रुक) यांचे शेतात तक्रारदार यांचे वडील अनिल रघुनाथ कदम, वय 55 वर्षे यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना तू आमचे शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही असे म्हणालेच्या कारणावरून दत्तात्रय अरुण यादव यांनी तक्रारदार यांचे वडील अनिल यांना शिवीगाळ करून त्यांनी तसेच त्यांची मुले जयंत दत्तात्रय यादव,हर्षद दत्तात्रय यादव यांनी फिर्यादीच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दत्तात्रय यादव याने काठीने अनिल कदम यानां मारहाण करून जखमी करून त्यांचा खून केला आहे तसेच सदर वेळी फिर्यादी तसेच फिर्यादीचे चुलते व चुलती असे सोडवा सोडव करीत असताना हर्षद यादव व जयंत यादव यांनी शिवराज कदम यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात केली खबरी वरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली असून घटनेचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत