कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ती जप्त केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान तासवडे टोल नाक्यावर सापडलेली १५ लाख रुपये नेमके कोणाचे? कोठून कोठे चालले होते याचा पोलीस तपास सुरू झाला असून लवकरच त्याची माहिती मिळणार आहे. सध्या हे वाहन व रोकड पोलीसाच्या ताब्यात आहे. काहीच दिवसांपूर्वी हवाला माध्यमातून तीन कोटी रक्कम लुटली होती ती जशीच्या तशी हस्तगत करण्याची कामगिरी एसपी समीर शेख यांच्या कराडच्या पोलिसांनी केली होती. आता त्याच प्रमाणे तपासनी दरम्यान टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले तळबीड आणि पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या करवाईबद्दल समाधान नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, तासवडे टोल नाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक विशेष कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटेच्या सुमारास कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक GJ 27 EE 8738 ला संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे 02:30 वाजता थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, वाहनामध्ये 15 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. सदर वाहन व रोख रक्कम तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी माहिती सांगितली. घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून पुढील तपासासाठी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कुठून आली व ती कोणाकडे जाणार होती, याचा तपास सुरू आहे. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी मागील व पुढील लिंकचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात रोकडी ऐन आचारसंहिता काळात कारवाई करून पोलिसांकडून जप्त केल्या जात असल्याचे चित्र आहे.
आचारसंहितेच्या दरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडून देणार नाही आणि कुणाचीही गई केली जाणार नाही सीसीटीव्हीच्या आणि पोलिसांच्या गस्तीच्या मार्फत जिल्ह्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यावेळी सांगितले