शिंपी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना – समाजबांधवांचा विजय :सुभाष मुळे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने शिंपी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासन निर्णय क्र. महामं-२०२४/प्र.क्र.७२ महामंडळे, मोती महल इमारत, चर्चगेट मुंबई-४०००२० दि. १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. शिंपी समाजाच्या विविध घटकांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे सुभाष मुळे (ना. स. प.सचिव पुणे शहर )यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
(उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस याना महामंडळ मागणी निवेदन देताना इंजि सुनील पोरे समवेत आमदार जयकुमार गोरे पत्रकार सुजीत आंबेकर आदी )
शासन दरबारी “समस्त शिंपी समाज महाराष्ट्र” च्या व्यासपीठावर विविध पोटजातीचे पदाधिकारी, महामंत्री ईश्वरजी धिरडे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲड. महेशजी ढवळे, शिक्षण महर्षी मा. भास्करराव टोंपे, कै. संजय खैरनार, वणेश खैरनार, ना.स.प. सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनीअर सुनील पोरे साहेब, संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज, डाॅ. नानासाहेब पाथरकर,सुजित आंबेकर, संदीप लचके, किशोर कुमठेकर व अनेक समाजबांधवांनी आपल्या स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले. यामध्ये कै. सुधीर पिसे आणि कै. संजीव तुपसाखरे यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले.
हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सातारा जिल्ह्याचे ना.स.प. अध्यक्ष इंजिनीअर सुनील पोरे साहेबांनी या निर्णयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी गेल्या वर्षी नामदेव जयंतीच्या निमित्ताने ११७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नामदेव समाजोन्नती परिषदेच्या माध्यमातून शिंपी समाजाच्या स्वतंत्र महामंडळासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते. या मागणीचा पाठपुरावा त्यांनी दि. १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत सातत्याने केला.
सर्व समाज बांधवांनी केलेल्या एकजुटीच्या या यशाचा श्रेयवादात न अडकता, सुनील पोरे यांनी मोठ्या मनाने सांगितले की, “हे यश सांघिक आहे; एका व्यक्तीचे नव्हे.” त्यांना खात्री होती की श्रेयवादात अडकून राहिल्यास महामंडळाची स्थापना कागदावरच राहू शकते आणि गरजू समाजबांधवांना त्याचा लाभ मिळणार नाही. या महान उद्दिष्टासाठी पोरे साहेबांनी स्वतःचा वेळ आणि आर्थिक खर्च केला. समाजाच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या अशा कर्मयोग्याचा गौरव करण्याची आज समाजाची जबाबदारी आहे.
सुभाष मुळे (पुसेसावळी )सचिव ना. स. प. पुणे शहर :
महाराष्ट्र शासन, आमदार जयाभाऊ गोरे, मंत्री व लोकप्रतिनिधी, तसेच समस्त शिंपी समाज महाराष्ट्र यांचे समाजबांधवांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार