व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल माण पंचक्रोशी साठी एक आशेचा किरण असून संकुलास उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन कराड अर्बन बँक कराड चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी म्हसवड येथे केले.
कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी नुकतीच कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर,
अर्बन बँकेचे विभागीय अधिकारी
संजय पोरे , प्राचार्य विन्सेंट जॉन, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोजारी , मनोहर गलांडे , अंकिता रवींद्र काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप गुरव म्हणाले शिक्षण संस्था सुरू करणे सोपे आहे, मात्र चालवणे अतिशय अवघड आहे. अनेक अडचणीतून व संघर्षातून विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी संस्था सुरू केली, वाढवली व अल्पावधीत नावारूपाला आणलेली आहे. या पाठीमागे त्यांचे कष्ट, उच्च ध्येय ,पालकांचा विश्वास तसेच संकुलातील विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी महत्त्वाचे आहे. बाबर दांपत्याचे समाज उपयोगी काम देश सर्वांगीण दृष्ट्या बलवान करण्यासाठी तसेच युवा पिढी घडवण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास गुरव यांनी व्यक्त केला. गुणवत्ता हाच शिक्षण संस्थेचा आत्मा असून त्यासाठी नियमित परिश्रम महत्त्वाचे आहेत. सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी होत असलेल्या कामाची तसेच उपक्रमाची दिलीप गुरव यांनी प्रशंशा केली.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अधिकारी होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल अंकिता रवींद्र काटकर हिचा सत्कार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती मान्यवरांना दिली.
सूत्रसंचालन चंद्रकांत तोरणे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार सुवर्ण टाकणे यांनी व्यक्त केले.