रा स प चे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे प्राध्यापकांच्या कडून अभिनंदन .

बातमी Share करा:

तासीका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन सहाशे रुपयावरुन नऊशे रुपये..

म्हसवड– (अहमद मुल्ला )

             रासप चे  संस्थापक अध्यक्ष व माजी कॅबीनेट मंत्री  आमदार महादेवजी जानकर यांनी हिवाळी अधिवेशनात प्राध्यापकांच्या अत्यंत महत्त्वाच्या  कळकळीच्या व ज्वलंत प्रश्नावर  लक्षवेधी उपस्थित करून महाराष्ट्रातील तमाम NET, SET, Ph.D पात्रता धारक व CHB, CONTRACT BASE, FIX PAY  वरिल प्राध्यापकांना   न्याय देण्याची भूमिका घेतली या बद्दल  तमाम प्राध्यापकाकडून      महादेव जानकर  यांचे अभिनंदन करुन त्यांचे आभार व्यक्त करण्यात  येत आहे
               नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात रा स प अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी   प्राध्यापक संघटनेच्या प्रमुख मागणी संदर्भात अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली त्यात
    सहा. प्राध्यापक पदभरती संदर्भात १२  नोव्हेंबर २०२१ व ११ एप्रिल २०२२ च्या शासन  निर्णयानुसार २०८८ पदांच्या भरतीच्या NOC त्वरित देण्यात याव्यात व २०२२ पर्यंतची सर्व रिक्त पदे १००% भरण्यात यावी.,
    तासिका तत्त्व (CHB) मानधन वाढीसंदर्भात डॉ. धनराज माने समितीच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करून या प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार प्रतितासिका १५००/ रू. मानधन वर्षातील ११ महिने देण्यात यावे.,
    १ ऑक्टोबर २०१७ च्या आकृतीबंधाला अंतिम मान्यता देऊन सहायक प्राध्यापक, शा. शिक्षण संचालक व ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अकृषी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागातील या पदांची 100% पदभरतीला मान्यता द्यावी
महादेव जाणकर यांनी उपस्थित केसेल्या प्रश्नावर
 _*चंद्रकांत पाटील यांनी दिलेली  यांचे उत्तरे
१)२०८८ जागांच्या भरती मध्ये ग्रंथपाल,शा.शिक्षण संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक यांना मान्यता दिलेली नव्हती जवळपास या १००० पदांच्या भरतीला अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मान्यता देण्यात येईल असे सांगितले.*
२)२०८८ सहा. प्राध्यापक पदांच्या NOC त्वरित देवू आमच्याकडे एकही NOC प्रलंबित ठेवण्यात येणार नाही असे सांगितले व यानंतर परत २००० पदांचा एक टप्पा भरण्याचे कबूल केले.
३ )CHB मानधन वाढीसंदर्भात ९००/ रुपये तासिका या दराने मानधन देण्याचे कबूल केले येणाऱ्या मार्च महिन्याच्या आर्थिक अधिवेशनात याला मंजुरी घेऊन शासन निर्णय पारित करण्याचे आश्वासन दिले.
आमदार महादेवजी जानकरांनी प्राध्यापकांना न्याय देण्याची भूमिका मांडल्याबद्दल प्राध्यापकांनी त्यांचे आभार मानले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!