माण तालुक्यातील म्हसवड परिसरातील 47 गावातील नागरिकांच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यालयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दहिवडीला जाण्याची आवश्यकता कमी होणार असून शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी सौ. सोनिया गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, अर्जुन (तात्या) काळे, अरुण गोरे, डॉ. संदीप पोळ, , प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, शिवाजीराव शिंदे,आप्पा पुकळे, नितीन दोशी, विजय सिन्हा, विजय धट, इंजि. सुनिल पोरे, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे, गणेश सत्रे, दादासाहेब काळे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या तहसील कार्यालयामुळे म्हसवडसह परिसरातील नागरिकांना विविध प्रशासकीय कामे जलद व सुलभ होणार असल्याचे समाधान सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे.