व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते दाऊद मुल्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल म्हसवड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी दाऊद मुल्ला यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दाऊद मुल्ला यांच्या नेतृत्वामुळे ओबीसी समाजात काँग्रेस पक्षाचे स्थान अधिक बळकट होईल, तसेच समाजाच्या समस्या प्रभावीपणे पक्षाच्या धोरणांमध्ये मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, डॉ. झिमल, माजी नगरसेवक कैलास भोरे, अहमद मुल्ला, हबीब काझी, शब्बीर तांबोळी, अशपाक मुल्ला, बशीर मुल्ला, श्रेणिक शहा, शशी ढोले, संतोष देशमुख, नितीन झगडे, विजय भोकरे, नवाज मुल्ला, रामभाऊ लिंगे, नारायण लोहार, गणेश लोहार, बाळू पिसे, प्रा. विलास लोखंडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले आणि उपस्थित मान्यवरांनी मुल्ला यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.