व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
किरोली वाठार, कराड (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या वाठार किरोली येथील पुलाच्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. या पुलाखालील रेल्वे मार्गामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पुलामुळे स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होत असून सुमारे 500 एकर ऊस वाहतूक आणि दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे.
या परिस्थितीची पाहणी भाजपाचे ज्येष्ठ नेते धैर्यशील कदम यांनी केली. कराड उत्तर मतदारसंघातील परिवर्तन रॅली दरम्यान कदम यांनी पुलाचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत कदम यांनी ही समस्या तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भीमराव पाटील, रामकृष्ण वेताळ, संजय घोरपडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.