व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, ता. माण: येथील पत्रकार अहमद मुल्ला यांचे चिरंजीव शोएब मुल्ला यांनी फिलिपीन्स येथील अँजीलस युनिव्हरसिटी विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त करून नुकतेच मायदेशी परतले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशानिमित्त नामदेव शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांच्या हस्ते डॉ. शोएब मुल्ला यांचा मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोरे कुटुंबीय आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
शोएब मुल्ला यांनी परदेशात जाऊन कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांचा सत्कार करण्यासाठी पोरे कुटुंबीयांनी खास भेट दिली. यामध्ये भाजप युवा नेते करणभैय्या पोरे, सौ. राजलक्ष्मी करण पोरे, ऍडव्होकेट शुभम पोरे, ऍड. प्राजक्ता ऊर्फ गौरी शुभम पोरे, चि. क्रिशव करण पोरे, कु. शिवगामिनी करण पोरे, कु. शिवांतिका शुभम पोरे, ज्येष्ठ गुरुवर्य लाटणे सर, इंजिनिअर सचिन लाटणे यांचा समावेश होता.
या सोहळ्यात बोलताना इंजिनिअर सुनील पोरे यांनी डॉ. शोएब मुल्ला यांच्या यशाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “साधारण परिस्थितीतून परदेशात जाऊन एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु शोएब यांनी आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून हे आव्हान पेलले आणि आपल्या कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करून समाजात त्यांना मोठे स्थान मिळवून दिले आहे. हा त्यांचा प्रवास इतर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.” यावेळी जेष्ठ गुरुवर्य लाटणेसर यांनी डॉ. शोएब यास शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या शिक्षनाचा उपयोग समाजातील गोरगरीब जनतेसाठी करावा अशी इच्छा ही व्यक्त केली
शोएब मुल्ला यांच्या या यशाने त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सोफिया मुल्ला यांनी केले यावेळी श्रीमती शहाजादी आर. मुल्ला,मलंग मुल्ला (बारलोनी ), सौ. नसीम मुल्ला,सलीम मुल्ला, सौ दिलशाद मुल्ला, अहमद मुल्ला, डॉ . सोफिया मुल्ला, आदम मुल्ला, सौ. जास्मिन मुल्ला,रेश्मा मुल्ला,शकील मुल्ला, सौ. अलिशा मुल्ला, उमरुद्दीन मुल्ला, सौ.शहनाज मुल्ला, सद्दाम मुल्ला, सौ.अफ्रिन मुल्ला,आरमान मुल्ला, लुकमान मुल्ला, अयान, अल्मास, आशना आदी मुल्ला परिवारातील सदस्य उपस्थित होते