आंधळी, ता. माण: जलनायक आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आंधळी गावात उत्साहात पार पडला. या समारंभात ग्रामसचिवालय कार्यालय, ज्ञानेश्वरी मंदिर सांस्कृतिक भवन, भोसले वस्ती सभामंडप, ज्योतिर्लिंग मंदिर संरक्षण भिंत, जानुबाई मंदिर संरक्षण भिंत आणि इतर अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
समारंभाची सुरुवात ग्रामदैवत हनुमान मंदिरात देवदर्शनाने झाली. त्यानंतर आमदार गोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत, गावातील विकासकामांसाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदायाच्या वतीने ज्ञानेश्वरी मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन निमित्त ग्रंथ भेट देण्यात आला, जो आमदारांनी स्वीकारला.
यावेळी बोलताना आमदार गोरे यांनी आंधळी गावात लवकरच नव्या बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू होईल, तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले जाईल, अशी घोषणा केली.
यावेळी ज्येष्ठ नेते डी एस भाऊ काळे, मा.जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे , मा.जिल्हा परिषद सदस्य आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे , मा.जी.प.सदस्य मिनाक्षी काळे, उपसरपंच सविता खरात,संचालक सुरेश पवार,अशोक शेंडे , अभिजित भोसले, आप्पा गोरे, बापूराव चव्हाण, सुधाकर काळे, जयश्री चव्हाण अश्विनी माने,अतुल खरात गोपाळ चव्हाण ताराचंद जगताप,संजय काळे, संजय भोसले,महादेव खरात , धनाजी जगताप ,आदि मान्यवर ग्रामस्थ माता _भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.