सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीची गंभीर घटना: संतोष नरळे याच्यावर गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी):
माण तालुक्यातील पर्यंती गावात, दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी, एका सरकारी वायरमनवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी संतोष छगन नरळे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी शिवराज अंकुश मंडले (वय 22 वर्षे), व्यवसाय वायरमन (वीज मंडळ शिकाऊ उमेदवार), हे सरकारी काम करत असताना ही घटना घडली. ते पर्यंती गावात एका केस कर्तनालयाच्या दुकानात वीज चोरीच्या संदर्भात कारवाई करत होते. दुकानात वीज मीटर न जोडता, चोरट्या पद्धतीने आकडा टाकून वीजपुरवठा सुरू असल्याचे दिसून आले होते. मंडले यांनी आकड्याची केबल काढण्याची कारवाई सुरू केली असता, संतोष नरळे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

संतोष नरळे यांनी मंडले यांच्यावर शारीरिक हल्ला करत त्यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडून शर्टाचे बटन तोडले. तसेच त्यांना कानाखाली मारून धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला. याव्यतिरिक्त, नरळे यांनी मंडले यांच्या शर्टाच्या खिशातील **INFINIX** कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर, शिवराज मंडले यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात संतोष नरळे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्हा क्रमांक 280/2024 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 132, 121(1), 309(4), आणि 352 नुसार गुन्हा नोंदवून नरळे यास अटक करण्यात आले

म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून तपासी अधिकारी पोउनि वाघमोडे पुढील चौकशी करत आहेत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!